Posts

Showing posts from April, 2020

Antar Gyani!!!

अंतर–ज्ञानी ©️ अमृता संभूस सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या शब्दकोशात अचानक एक नवीन शब्द रुजू झाला आहे , तो म्हणजे Social Distancing. हा सगळा प्रकार नवीन वाटत असला तरी वेगवेगळ्या मार्गे आपण अनेकदा हे Social Distancing करत असतोच. “अंतर” ठेवणे हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक भागच आहे. वाहन चालवताना रस्त्यावर बरेचदा आपण “सुरक्षित अंतर ठेवा “ अशी सूचना वाचतो . गाड्या जास्त जवळून चालवल्याने अपघात होऊ नये म्हणून हे Social Distancing पाळतोच की. “दुसरे मुल केव्हा ...... पहिले बालवाडीत जाईल तेव्हा “ ही अशी जाहिरात पूर्वी tv वर , बसच्या मागे , वगैरे दिसायची . हा देखील त्यातलाच प्रकार . इकडे Distancing private असलं तरी हेतू मात्र Social आहे ना 😀... या व्यतिरिक्त जर आजूबाजूला दृष्टीक्षेप टाकला तर लक्षात येईल की सगळीकडेच “अंतर” फार महत्वाची भूमिका बजावत असतं . आपल्या दोन “श्वासात” आणि "हृदयाच्या ठोक्यात" सुद्धा "अंतर" असतंच आणि ते नसतं तर काय झालं असतं याचा अंदाज आपल्याला साधी धाप लागली तरी येतो . वृक्षावरोपण करताना दोन झाडांमध्ये अंतर ठेवावं लागतं नाहीतर झाड